HW News Marathi
मुंबई

मराठी भाषा दिनातून शिवसेनेला वगळले, रावतेची मात्र हजेरी

आज जागतिक मराठी दिन साजरा होत असताना विधानभवन परिसरात शिवसेना भाजपमधील वाद दिसून आला. भाजपने शिवसेनेला या कार्यक्रमातून वगळले. परंतु दिवाकर रावते यांनी मराठीचे प्रेमापायी या कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पार्पण करताना मुख्यमंत्र्यासोबत न जाता रावते यांनी स्वतंत्रपणे पुष्पाहार अर्पण केले.

मराठीचा मुद्दा पुढे करून शिवसेना राजकारण करते. परंतु अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीचा अवमान झाल्यानंतर शिवसेनेने शांततेची भूमिका घेतली होती. आज दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्र गीत सादर होताना अखरेचे कडवे गायब झाल्याने विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी देखील शिवसेना गप्प होती.

त्यात शिवसेनेला मुख्य कार्यक्रमातून वगळण्यात आले. तरी त्यांनी सत्तेचा भाग असल्याने आपण सहभागी झाल्याचे रावते म्हणाले. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही हजेरी लावून मराठीवर आमचे असलेले प्रेम व्यक्त केल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. सत्तेचा भाग असल्याने असे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसूत महिलेच्या मृत्यु प्रकरणी कारवाई होणार

News Desk

BREAKING NEWS | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत

News Desk

संघ आमचा आई बाप आहे परिषदेत चंद्रकांत दादांची दादागिरी

News Desk