HW News Marathi
मुंबई

सामाजिक कार्यकर्त्या सरोज कामत यांना सक्षम महिला पुरस्कार प्रदान

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या सरोज कामत यांना यंदाचा सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा सक्षम महिला पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला. सक्षम महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष संध्या श्रीवास्तव, युवा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाळे, अन्नपूर्णा महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्ष विमल आव्हाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सरोज कामत या गेली अनेक वर्षे समाजातील विविध समस्यांवर काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहाय्य करीत आहेत. तसेच त्या युवा आधार फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत. सरोज कामत यांच्या तीनही कन्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सरोज कामात यांना हा पुरस्कार प्रदान करताना चेतना जेठवा, राकेश हरचंदनी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील संस्थांच्या कामाचा आढावा घेऊन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk

मुंबईत सीएसटीसमोर चालत्या टॅक्सीनं घेतला पेट

News Desk