HW News Marathi
मुंबई

मोबाइल चार्जिंगला लावून बोलणे जीवावर बेतले

मुंबई – अनेकदा सूचना करूनही लोकं मोबाइल चार्जिंगला लावून त्यावर गप्पा मारताना दिसतात. मोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने मंगळवारी संध्याकाळी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. तप्पन गोस्वामी असं या तरुणाचं नाव आहे. तो एका बुटिकमध्ये काम करत होता.

28 वर्षीय तप्पन गोस्वामी मूळचा पश्चिम बंगालचा होता. काही दिवसांपुर्वीच नोकरीसाठी तो मुंबईत आला होता. वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत एका फ्लॅटमध्ये तो राहात होता. मंगळवारी संध्याकाळी त्याचा मित्र संजय घरी आला होता. या वेळी तप्पन जमिनीवर बेशुद्धवस्थेत पडला होता. त्याला तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता‘. विजेचा झटका लागल्याने तप्पनचा मृत्यू झाल्याची माहिती भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रदीप जाधव यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास सरकारचा पुन्हा नकार ; काय म्हणाले या चर्चेत धनंजय मुंडे

News Desk

मुंबईतही रिपाइंला भाजपकडून सापत्न वागणूक

News Desk

पुणे डंपरच्या धडकेत युवती ठार

News Desk