HW News Marathi
मुंबई

श्रीदेवी यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. श्रीदेवींचे पार्थिव मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरातील राहत्या घरी त्यांचे पार्थिव पोहोचले.

श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल आंबानी यांच्या खासगी विमानाने मुंबईत आणण्यात आले. मंगळवारी रात्री १०वाजताच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे पार्थिव पोहोचले. वर्सोव्यात सेलिब्रेशन क्लबमध्ये बुधवारी सकाळी ९.३० ते १२.३० या कालावधीत श्रीदेवींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी दोन वाजता श्रीदेवींच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल, तर साडेतीन वाजता विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दुबई पोलिसांनी मंगळवारी श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल सर्व तपास पूर्ण केला. या प्रकरणी त्यांनी बोनी कपूर यांची चौकशी केली होती. मात्र, चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे दुबई पोलिसांनी तपासाची प्रक्रिया बंद केली. श्रीदेवी यांचे पार्थिव बोनी कपूर यांचा भाचा सौरभ मल्होत्रा यांनी स्विकारले. त्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन कपूर कुटुंबिय मुंबईकडे रवाना झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक फुटणार ? 

News Desk

शौचालयाची टाकी कोसळून तीन जणाचा मृत्यू

News Desk

राजभवनात सापडल्या दोन ब्रिटिशकालीन तोफा

News Desk