HW News Marathi
मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

– संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे वाढले पाहीजे ही सरकारची भूमिका असून वेतनवाढी संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेनं पुकारलेला संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. एसटी कर्मचारी संघटनां बरोबर मुख्यमंत्र्यांनी आज चर्चा केली त्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान या समितीमध्ये एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करुन वेतनवाढीबाबत सार्वमताने तोडगा सादर करावा, तो निश्चित मान्य केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. वेतनवाढी बाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे ते म्हणाले. एसटी महामंडळावर बोजा पडून ते अजून तोट्यात जाणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान दिवाळीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने एसटी कामगार संघटनांनी संप करु नये, असे आवाहन आपण केले असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

News Desk

शरद पवारांविषयी केलेलं ते वक्तव्य संजय राऊतांना भोवलं,राऊत शिवसेनेत आहेत का राष्ट्रवादीमध्ये ?कॉंग्रेसचा सवाल

News Desk