HW News Marathi
मुंबई

कॉग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त

मंत्रालयाला पोलीस छावणीचे स्वरुप
मुंबई | तरुणांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी (पकोडे) विकणे चांगले आहे, असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. याचा निषेध करण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्यावतीने मंत्रालयासमोर भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल सुरु करून अनोखे आंदोलन काही वेळातच केले जाणार असल्याने मंत्रालयाच्या परिसरात पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील बेरोजगार तरुणांना आवाहन केले आहे की, त्यांनी लवकरात लवकर भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल टाकावे. काही बेरोजगार तरुण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी दुपारी ३.०० वाजता, मंत्रालया समोर भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल सुरु करणार आहेत. हे बेरोजगार तरूण पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स प्रती सोबत घेऊन हे अनोखे आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर आणि परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

News Desk

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk

म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत

News Desk