HW News Marathi
मुंबई

भाईंदरमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

भाईंदर। भाईंदरमध्ये दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना दुकानदारांनी जबर मारहाण केली आहे. दिवाळीचे पैसे दिल्यानंतरही या तृतीयपंथीयांचे समाधान झाले नव्हते, त्यांनी दुकानदारांकडे जास्तीचे पैसे मागायला सुरुवात केली. जास्त पैसे द्यायला नकार दिल्याने तृतीयपंथीयांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळामुळे भडकलेल्या दुकानदारांनी त्यांना चोपले. या मारहाणीनंतर तृतीयपंथीयांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाईंदर पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका दुकानात दिवाळीची भेट म्हणून पैसे मागण्यासाठी गेलेले तृतीयपंथीय आणि दुकानदारामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. दुकानासमोर कपडे उतरवून अश्लील चाळे करायला सुरुवात केल्याने दुकानदार आणि स्थानिकांनी ३ तृतीयपंथीयांना लोखंडी सळई आणि बांबूने जबर मारहाण केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या तीन तृतीयपंथीयांना येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

92 लाख दंड भरण्यास शासकीय अधिका-यांची चालढकल

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

चार रुपड्यासाठी इमान विकू नका: राज ठाकरेंचे प्रशासनाला खरमरीत पत्र

swarit
राजकारण

दिवाळीची खरेदी करताय, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या !

News Desk

दिवाळी म्हटली की लहानग्यांनपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीची तयारी पंधरा दिवस आधीपासूनच सर्वांच्या घरात सुरु होते. साफ-सफाई, फराळ, घराची सजावट, आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठी नवीन कपडे. तर या वर्षी तुम्हाला दिवाळीची खरेदी कुठे करायची असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही खालील ठिकाणांना भेट द्या.

कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवे हे ठिकाण महिलांसाठी आणि मुलींसाठी एक शॉपिंग हब आहे. कोलाबा कॉजवे मध्ये नेहमी आनंदोउत्सव असतो. त्या बाजारपेठेत खरेदी करण्यासारखा दुसरा कोणत्याही अनुभव नाही. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांमध्ये कुलाबा कॉजवेला खरेदी करण्याचा मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. इथे दोन प्रकारची खरेदी आपण करू शकतो. एक म्हणजे ब्रँडेड कपडे विख्यात असे ब्रँड आणि दुसरे म्हणजे दररोजच्या वापरातील कपडे अगदी कमी किंमतीत आपण खरेदी करू शकतो.

कुलाबा कॉजवे हे Ethnic ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये Earings, Neckpis, bangles, Anklet इत्यादी महिलांचे सौंदर्य खुलवणाऱ्या वस्तू तिथे मिळतात. इतकंच नव्हे तर कुलाबा कौझवेला अँटिक वस्तूसुद्धा तिथे मिळतात,लॅम्प, मातीची भांडी, लाकडी बाहुल्या,सॅण्ड क्लॉक, नकाशे,होकायंत्र शोपीससाठीच्या वस्तू तिथे मिळतात. जर आपल्याला खरेदीपासून ब्रेकची आवश्यकता असेल तर लिओपॉल्डच्या कॅफेमध्ये किंवा कॅफे मॉंडेगरमध्ये दोन प्रसिद्ध मुंबई हँगआउटमध्ये जाऊ शकतात.एकदा तरी कुलाबा कॉजवेला भेट दिली गेली पाहिजे.

लिंकिंग रोड

आर्ट ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, महिला पिशव्या आणि इतर बऱ्याच लहान अॅक्सेसरीजसाठीलिंकिंग रोड प्रसिद्ध आहे. महाविद्यालयीन मुलींसाठी बांद्रा हा एक शॉपिंग हब आहे! नवीनतम कपडे, बूट व उपकरणे, लिंकिंग रोडमध्ये हे सर्व आहे. बार्गेनिंग अतिशय प्रबळ आणि योग्य आहे. लिंकिंग हे फुटवेअरसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोजच्या वापरातले कपडे इथे कमी किंमतीत मिळतात. तसेच वेस्टर्न आऊटफिट्स तिथे कमी किंमतीत मिळतात.

दादर हिंदमाता

दादरचे हिंदमाता मार्केट पारंपरिक कपडे मिळतात. इथे साडी पंजाबी ड्रेस, शेरवानीसाठी हिंदमाता मार्केट फेमस आहे. इथे होलसेल रेटमध्ये मालाची विक्री होते. साडीसाठीची दुकाने इथे फेमस आहेत.इथे मोठ्या प्रमाणात लग्नासाठीचे बस्त्यासारखे कार्यक्रम इथे होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रांचा मालाची विक्री करतात आणि रेडमिड वेअर, सारीस, सलवार कमिझ आणि रेडीमेड शेरवानीस यासाठी प्रसिद्ध आहे.

झवेरी बाजार

केवळ मुंबईतच नव्हे तर भारतातील सर्वात लोकप्रिय आभूषण बाजारपेठांपैकी एक झवेरी बाजार हि एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत विविध दुकाने आहेत ज्यात मौल्यवान स्टोन,अनावश्यक दागदागिने आणि सोन्याचे इत्यादी वस्तू विकल्या जातात. टीबीझेड आणि तनिष्कसारख्या काही ब्रॅण्ड्सचे स्टोअर येथे स्थापन केले आहेत.

Related posts

सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

Aprna

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk