HW News Marathi
मुंबई

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक

मुंबई रात्रीच्यावेळी कारचालकांना चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या एका अल्पवयीन मुलांच्या टोळीला दिंडोशी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभाग पथकाने 5 ऑगस्ट रोजी रात्रीच्यावेळी गस्त घालताना अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 22 हजार रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे चोरी केलेले 75 अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल परिसरात 5 ऑगस्ट रोजी दिंडोशी पोलीस ठाण्याचे गुन्हे पथक रात्री गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती चोर चोर ओरडत या अल्पवयीन मुलांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांना त्या टोळीतील 6 पैकी 4 अल्पवयीन मुलांना पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतली असता त्यांना एक मोबाईल फोन व सुरा मिळाला. कार चालकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरी व लूट करणाऱ्या अल्पवयीन मुलांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला. त्यांच्याकडे अधिक तपास करून पळून गेलेले 2 अल्पवयीन मुल व इतर 2 आरोपींना अटक केली. पोलीस तपासात या टोळीने 9 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ही मुले चोरी केलेले मोबाईल फोन कमी किंमतीत एका दुकनादाराला विकतात आणि मिळालेल्या पैशांतून नशा करत असल्याचे समोर आले आहे. चोरीचा मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून दुकानदार एका मशीनने तो फॉरमॅट मारतात आणि ऑनलाइन संकेतस्थलांवर जास्त किंमतीत विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलांच्या टोळीची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली आहे. तर उर्वरित आरोपी मोह. शाहबुद्दीन मोह. सल्लाउद्दीन मन्सूरी 29, दुकानदार मुबारक सिद्दीक खरोजिया 20 यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेने कंबर कसली! लवकरच मुंबईत होणार पदाधिकाऱ्यांचा मेळावा

News Desk

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk

मुंबईमध्ये “माणदेशी महोत्सव” ३ जानेवारीला

News Desk