HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांनी सीएसएमटी येथे अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चर्चगेट मधील एच. आर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरी केला. २९ राज्ये, ७ केंद्रशासित प्रदेश, अनेक विविध भाषा एका नावाखाली असतात ते नाव म्हणजे भारत. भारत हा एक असा देश जिथे एका कॅथॉलिक पंतप्रधानांनी आपले पद सोडल्यावर एका शिखाणे देशाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या नंतर एका मुसलमानाने बहुसंख्य हिंदू असलेल्या देशाचे मार्गदर्शन केले. विविधता आणि भारताची एक योग्य व्याख्या, विविधतेत युनिटीचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत.

आज १३ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चर्चगेट मधील एच. आर. महाविद्यालया तर्फे फ्लॅशमोबचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिन साजरे करण्यासाठी एक नृत्य करण्यात आले. यावेळी स्टेशनवर काम करणा-या अधिकारी, स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस यांना मॅडेल देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्यासाठी २४ तास मुंबईचे तसेच आपले रक्षण करण्यासाठी हे अधिकारी तसेच कर्मचारी कार्य करत असतात. आमच्या क्लबचे सदस्य सामान्य जनतेसोबत सर्वेक्षण करणार आहेत ज्या योगे त्यांना आपल्या देशाबद्दल अधीक ज्ञान मिळेल आणि हीच लोक ह्या विषयी जागरुकता निर्माण करतील. असे त्रिशा या विद्यार्थिनीने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

खाजगी बस अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

News Desk

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk