HW News Marathi
देश / विदेश

भाईगिरी नंतर डॅडी गांधीगिरीत अव्वल

नागपूर | एकेकाळी आपल्या दहशतीने मुंबईवर अधिराज्य गाजविणारा कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ “डॅडी’ने महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास केला असून मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या “गांधी विचार’ परीक्षेत त्याने सहभाग नोंदवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर यांच्या माध्यमातून 80 गुणांची गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. गांधी विचाराच्या पुस्तकातून ‘बापूं’चे धडे गिरवत अंडासेलमध्ये असलेल्या डॅडी उर्फ अरुण गवळीने कारागृहाने घेतलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘टॉपर’ येण्याचा बहुमान पटकावला. कारागृहातील बंदीजनांचे जीवन सुधारुन कैद्यांना गुन्ह्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

त्यामुळे गांधी विचार परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम आणि मुंबईतील सर्वोदय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही बंदीजनांसाठी गांधी विचार परीक्षा घेण्यात आली. कारागृहातील १६० बंदीजनांनी या परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेत कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळीने चक्क अंडासेलमध्ये ‘बापूं’च्या पुस्तकातील धडे गिरवत गांधी विचार परीक्षेत टॉपर येण्याचा ‘विक्रम’ केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक सादर, विरोधकांचा गोंधळ

News Desk

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

News Desk

दहशतवादी हल्यात जखमी झालेल्या गर्भवती महिलेची यशस्वी प्रसुती

swarit