HW News Marathi
मुंबई

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

मुंबई : आपल्या आईची तब्येत सध्या फारच खालवली असल्याने तिची सेवा करण्यासाठी आपल्याला काही दिवसांचा जामीन देण्यात यावा, अशी विनंती घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपने केली आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. हायकोर्टाने शितपच्या अर्जावर मुंबई पोलिसांचा अहवाल मागवला असून त्यांना शितपने केलेल्या दाव्यांची शहानिशा करुन सोमवारपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढील आठवड्यात सुट्टीकालीन न्यायालयात या अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

सिद्धी साई इमारत दुर्घटना

घाटकोपर २५ जुलै २०१७ रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेत एकूण बारा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावले जात होते. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहिती होती, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी सावरकरभक्तांचे उपोषण

News Desk

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk