HW News Marathi
राजकारण

भाजप नगरसेवकाची भारत मॅट्रिमोनी विरोधात तक्रार

पुणे : भाजपचे नेते विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यामध्ये अनेकदा बेताल वक्तव्यामुळे या नेत्यांवर सर्व बाजूंनी टिका देखील केली जाते. परंतु पुण्याच्या गुरुवार पेठ मधून निवडून आलेले वॉर्ड क्रमांक १८ चे भाजप नगरसेवक सम्राट थोरात हे मॅट्रिमोनियल साइटवरच्या फोटोमुळे सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

पूर्वी लग्न जुळविण्यासाठी वरीष्ठ मंडळी मध्यस्थी करत त्यानंतर मधल्या काळात विवाह मंडळांव्दारे लग्न जुळवले जात असे. परंतु हल्ली लग्नजुळवताना आपल्या पसंतीचा जोडीदार शोधण्यासाठी अनेकजन डिजीटल प्लॅटफॉर्म असलेल्या मॅट्रिमोनियल साईटचा आधार घेतात. अशा साइटवर विविध प्रकारे लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती दिल्या जातात. मात्र आपली जाहिरात करण्याच्या हेतूने केलेल्या स्टंटमुळे भारत मॅट्रिमोनीयल साईट वादाच्या भोव-यात अडकली आहे.

पुण्याचे भाजप नगरसेवक सम्राट थोरात यांच्या परवाणगीशिवाय त्यांच्या लग्नाचे फोटो वेबसाइटर अपलोड केल्यामुळे सम्राट थोरातांनी भारत मॅट्रिमोनीचे मॅनेजर आणि आयकॅफे मॅनेजरविरोधात कलम ३७९ (चोरी), ४२० (फसवणूक), ४०६ (गुन्हेगारी पातळीवर विश्वासघात) ४९९ (प्रतिमा मलीन करणे) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या वेबसाईवटर दाखविण्यात आलेल्या फोटोंमुळे सम्राट थोरात यांचे लग्न याच मॅट्रिमोनी साइटवरुन ठरले असल्याचा अनेकांना संभ्रम झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती

Manasi Devkar

पंतप्रधान मोदी घेणार सरसंघचालकांची भेट ?

News Desk