HW News Marathi
मुंबई

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

मुंबई | दादर रेल्वेस्थानकावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एका टॅक्सी चालकाने गैरवर्तन केल्याची घटना घडली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती देत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार देखील केली. या घटनेची गंभीर दाखल घेत “सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या. एकही टॅक्सीवाला किंवा दलाल रेल्वे स्थानकावर दिसणार नाही”, असे आश्वसन मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी दिले आहे. रेल्वे प्रशासनाकडून याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर आपण आपल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. यावेळी, दादर रेल्वे स्थानकावर कुलजीतसिंह मल्होत्रा नावाच्या टॅक्सी चालकाने सुप्रिया सुळे यांनी गैरवर्तन केले. सुप्रिया सुळे यांनी आपल्या टॅक्सीमध्ये बसावे म्हणून तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुप्रिया सुळेंनी दोनदा नकार देऊनही तो त्यांचा रस्ता अडवू लागला. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्याने सुप्रिया सुळे यांच्याकडे सेल्फीसाठी आग्रह देखील धरला. सुप्रिया सुळे यांनी घडलेला हा संपूर्ण प्रकार ट्विट करून सांगितला. त्याचप्रमाणे त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे कारवाईची मागणी देखील केली. मनसेकडून आता याची दखल घेण्यात आली आहे.

काय म्हणाले नितीन नांदगावकर ?

“दलाल आणि टॅक्सी चालक प्लॅटफॉर्मवर येणार नाहीत यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीस जागे व्हावे नाहीतर आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो आणि दलाल सापडले तर मात्र त्यानंतरची जबाबदारी तुमची राहील. जिथे जिथे महिलांच्या मानसन्मानाला ठेच पोचेल तिथे तिथे अशा समाजकंटकांना सोडणार नाही. १५ दिवस रेल्वे प्रशासनाला दिले त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अन्यथा १६ वा दिवस फक्त माझा असेल”, अशी फेसबुक पोस्ट नितीन नांदगावकर यांनी दिली आहे.

“मुंबईत रोज रेल्वे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मवरती टॅक्सी चालक आणि त्यांचे दलाल ट्रेन मध्ये जबरन घुसून महिला-पुरुष प्रवाशांना त्रास देत असतात तेही बिना लायसेन्स, बिना तिकीट बिना परवाना रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनदास्त दिवस-रात्र आपले सावज शोधत असतात आणि त्यासाठी रेल्वे पोलिसांना आणि इतर विभागांना मिळतो त्याचा मोबदला म्हणजेच हप्ता. रेल्वे प्रशासनाने वेळीस जागे व्हावे. नाहीतर आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो आणि दलाल सापडले तर मात्र त्यानंतरची जबाबदारी तुमची राहील”, असेही नितीन नांदगावकर यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१३ वर्षांची मुलगी गरोदर; दिला बाळाला जन्म

News Desk

धक्कादायक…मानखुर्दमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

News Desk