HW News Marathi
मुंबई

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

केडीएमटीमार्फत लवकरच महिला विशेष तेजस्विनी बस सुरू होणार आहे. या बसेस खरेदी करण्यासाठी येणार्‍या खर्चास वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी परिवहन समितीने दिली असून तो प्रस्ताव आता २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून हा प्रस्ताव मंजूर होताच केडीएमटीच्या ताफ्यात महिला विशेष बसेस दाखल होणार आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करत त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या निधीमधून कल्याणडों बिवली मनपा परिवहन उपक्रमाला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बसेस खरेदी करण्याबाबत ६ मे २०१७ रोजी परिवहन समितीच्या मंजुरीनंतर तब्बल सहा महिन्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेत संबधित प्रस्ताव ठेवण्यात आला असून महासभेची मंजुरी होताच महिलासाठी विशेष बस तेजस्वनी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. राज्य शासनाने नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर कल्याण-डोंबिवली या शहरांना महिलांसाठी तेजस्विनी बस योजना कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे. सुमारे १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात चार बस खरेदी करण्याबाबत परिवहन समितीच्या मंजुरीनंतर महासभेत हा विषयावर चर्चा होणार असून महासभेच्या मंजुरीनंतर आगामी तीन महिन्यात ताफ्यात या बसेस येण्याचा मार्ग सुकर होणार आहे. कल्याण डोंबिवलीमधील केवळ महिलांसाठी सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत या बसेस धावणार असून यामधील प्रतिसाद पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या महासभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

News Desk

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit

भाजपाच्‍या उमेदवारी निवडीची प्रक्रिया पारदर्शी पध्‍दतीने

News Desk