HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री भेटीसाठी उद्धव ठाकरे अडीच तास ताटकळले

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट न घेताच परतले. नियोजित बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून उशीर झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना तासभर प्रतीक्षा करुन परतावे लागले. दरम्यान, याच वेळी नारायण राणे हे विधानभवनमध्ये दाखल झाले. त्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बुधवारी संध्याकाळी बैठक नियोजित करण्यात आली होती. शिवसेना आमदारांच्या निधीसंदर्भात काही विषय मांडण्यासाठी ‘शिवालय’ या शिवसेनेच्या कार्यालयात ही भेट होणार होती. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजल्यापासून उद्धव ठाकरे वाट पाहत बसले होते. मात्र सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे फडणवीस ठरल्या वेळी येऊ शकले नाहीत. अखेर उद्धव ठाकरे भेट न घेताच निघून गेले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढची वेळही ठरवून दिली. त्याचप्रमाणे नियोजित बैठकीला वेळ देता न आल्याबद्दल फडणवीसांनी दिलगिरीही व्यक्त केली.चर्चा आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयसीटी शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू – राज ठाकरे

News Desk

“…ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही”; राऊतांच्या सुटकेवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

Darrell Miranda

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

News Desk