HW News Marathi
मुंबई

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले होते. ५८ मूक मोर्चे काढले. अनेक ठिय्या आंदोलन केली. तरी सरकारला जाग आली नाही. आंदोलन करुन देखील आरक्षण मिळत नाहीत. त्यामुळे ३१ सप्टेंबर रोजी पक्षाची स्थापना करणार असल्याचे मराठा क्रांती संघटनेचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाच्या २५ ते २६ संघटनांना एकत्रित घेऊन पक्षाची स्थापना करणार आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांवर आमचे उमेदवार असतील. प्रतापगडावर पक्षाचे नाव, ध्येय धोरण, सूचना देण्यात येईल.

या पक्षामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा हात नसेल आणि कोणत्याही पक्षाची भेट घेणार नाही. आज पर्यंत सर्व पक्षाने आमची मराठा समाजाची फसवणूक केली आहे. तसेच धनगर आरक्षण, मुस्लिम, विषमता दूर करण़्यासाठी पक्षाची स्थापना आम्ही करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यपाल नियुक्त आमदार नको म्हणून राज्यपालांच्या निर्णयाला फडणवीसांचा पाठिंबा

News Desk

मुलुंड डंपिंग ग्राऊंड १ ऑक्टोबरपासून बंद

swarit

मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी देखील खोळंबा

News Desk
मनोरंजन

सण नारळी पौर्णिमेचा

News Desk

गौरी टिळेकर | श्रावणी पौर्णिमेचा हा दिवस भारतात विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांकडून ‘नारळी पौर्णिमे’चा सण म्हणून साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नागपंचमीनंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसूचक मानलेले आहे. संगमापेक्षाही सागर जास्त पवित्र मानला जातो. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. होड्यांनी मासेमारीला जाताना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो आपल्याला सहाय्य करतो, अशी कोळी बांधवांची श्रद्धा असते.

या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. वरुणदेवतेला आवाहन करताना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात, असे मानले जाते. म्हणून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

Related posts

घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?- सुरेखा पुणेकर यांचा सवाल

News Desk

थंडावा देणारा ताडगोळा

swarit

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar