HW News Marathi
मुंबई

अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | जमिनीचा निकाल विरोधात लागल्यामुळे मंत्रालयासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव असून मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने वेळीच धावपळ केल्यामुळे महिलेला ताब्यात घेण्यात आहे. त्यामुळे घडणारा अनर्थ टळला आहे.

आपल्या जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने नैराश्येतून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदर महिला राधाबाई या बीडच्या रहिवासी आहेत. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोगेश्वरीत म्हाडाच्या इमारतीला भीषण आग

News Desk

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

News Desk

सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…

News Desk