HW News Marathi
मुंबई

चार कोटीसह व्हॅन घेऊन चालक फरार

पुणे : एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली चार कोटी रुपयांची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसमध्ये घडली आहे. सासणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आयसीआयसीआय बँकेच्या सासणेनगरमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी खासगी एजन्सीचे कर्मचारी व्हॅनमधून आले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षकही होता. पैसे भरण्यासाठी सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी गाडीतून खाली उतरले. हीच संधी साधत चालकाने गाडीतील चार कोटींच्या रोकडसह पोबारा केला. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने पळ काढला होता. आरोपी चालकाचं नाव अजून समजलेलं नाही.याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे शहरासह शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल

News Desk

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk

छगन भुजबळ यांना केईएम हॉस्पिटल मध्ये हलवणार

News Desk
मुंबई

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जवळपास 30 लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Related posts

अबू सालेमच्या निकाहाला विघ्न, हायकोर्टाने पॅरोल याचिका फेटाळली

swarit

शिवाजी पार्क येथे ६० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk