HW News Marathi
मुंबई

परदेशातून आलेल्या मुलाला आढळला मातेचा सांगाडा

मुंबई : वृद्ध मातेला एकटी ठेवून परदेशात राहणाऱ्या मुलाला भारतात परत आल्यावर जबर धक्का बसला. कारण फ्लॅटचे दार उघडल्यावर त्याला आई नव्हे, तर तिचा केवळ सांगडा सापडला. पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथील उच्चभ्रू वस्तीत आलिशान फ्लॅटमध्ये एकट्या राहात असलेल्या आशा केदार सहानी या ६५ वर्षांच्या वृद्धेबाबत हा दुर्दैवी प्रकार घडला.

ओशिवरातील वेल्स कॉड सोसायटीमध्ये आशा सहानी एकट्याच राहात होत्या. त्यांचा मुलगा केदार आयटी इंजिनीअर असून गेल्या काही वर्षांपासू तो अमेरिकेत राहात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याचे आईशी बोलणे झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये काहीही संवाद नव्हता. केदार शनिवारी भारतात परतला. फ्लॅटचा दरवाजा उघडत नसल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्याला चक्क मातेचा सांगडा दिसला. अनेक महिन्यांपूर्वी आशा यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात, याचा उलगडा झालेला नाही. ओशिवरा पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, एकट्या राहात असलेल्या आशा यांची चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रस्त्याच्या दुरावस्थेप्रकरणी पालिकेकडून कंत्राटदारांवर करवाई

News Desk

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

News Desk
देश / विदेश

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

नवी दिल्ली : रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठीचे शुल्क वाढविल्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांच्या शुल्कातून रेल्वेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४०० कोटी रुपयांची बेगमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्याबरोबरच आरक्षण रद्द करणेही रेल्वेच्या पथ्यावर पडत आहे.

तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्यामुळे वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहीती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत दिली. नोव्हेंबर २०१५ पासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट ४८ तासआधी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९० रुपये होते. याच पद्धतीने एसी २

टियरचे तिकिट रद्द केल्यास १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल प्रवाशांकडून ६०रुपयांऐवजी १२० रुपये आकारणे सुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३० ऐवजी ६०रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.

याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तत्काळद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. यासर्व गोष्टींमुळे रेल्वेचा महसूल वाढत आहे.

Related posts

दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या निकालाआधीच भाजपाने स्वीकारली हार?

swarit

पुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता !

News Desk

मुंब्र्यातून ४ तर औरंगाबादमधून ५ जण एटीएसच्या ताब्यात

News Desk