HW News Marathi
मुंबई

मुंबईतील रेल्वे विभागाच्या धोकादायक पुलांचा प्रश्न चव्हाट्यावर

मुंबई: लोकलने प्रवास करणे प्रत्येक क्षणाला जिकरीचे ठरते. कधी अपघात होऊन जीव जाईल, याची कुणालाही शाश्वती नसते. मुंबईची लाइफलाइन असलेली ही लोकल दररोज अनेकांचे बळी घेत आहे. प्रवाशांची संख्या आणि अपुºया सुविधांमुळे दररोज निष्पाप लोकांचे बळी जात आहे. परळच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कुठल्याही क्षणी अपघात होऊन त्यात आपली जीव जाऊ शकतो, याची खात्री असताना प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत प्रवास करतात. अनेकांनी प्रवासातील समस्यांविषयी रेल्वे विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची साधी दखल घेतली जात नाही. त्यातून परळ येथील घटना घडत आहे.

दादरहून परळला आल्यानंतर बाहेर पडण्यासाठी अरूंद पूल आहे. त्यावर सतत गर्दी असते. चाळीस पाय-या चढण्यासाठी सात ते आठ मिनिटे वाट पाहावी लागते. किंवा रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर कसेबसे गर्दीतून बाहेर पडल्यानंतर वरील पुलावर देखील फेरीवाले, प्रवाशांची तोबा गर्दी असते. यातून मार्ग काढताना चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागते. परंतु हा सर्व प्रकार अवघ्या काही मिनिटांचा असल्याने तसेच तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा भागचा मानून सर्वजण हा त्रास सहन करतात. त्यातून चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. वरकरणी पाहिल्यास हा नेहमीप्रमाणे अपघात वाटत असला तरी या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. रेल्वे स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी जागा नाही, त्यामुळे निमुळत्या बोळीतून प्रवाशी झुंडीने बाहेर पडतात. पाऊस झाल्यास सर्व स्थानक व पूल गर्दीने फुलतात. पुलाखालून रेल्वे गेल्यानंतर पूल झुल्यासारखे हलातात. अनेकदा हे पूल कोसळतील की काय, अशी भीती मनाला स्पर्श करून जाते. मुंबईत अनेक पूल आजही अशाच स्थितीत आहेत. जे केव्हाही पडू शकतात. ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते त्याच ठिकाणचे पूल धोकादायक स्थितीत आहे. अंधेरी स्थानक परिसरातील टिकीत केंद्र व पादचारी केंद्र धोकादायक आहे. मोठी गर्दी झाल्यानंतर संपूर्ण स्थानक परिसरात हदरे बसतात. गर्दी वाढल्यास हा पूल कोसळून हजारो प्रवाशी मृत्यूमुखी पडू शकतात. परंतु याकडे कोणाचे लक्ष जात नाही. आपली मुर्दाड व्यवस्था व चलता है मानसिकता अशा घटनांना निमंत्रण देत आहे. गर्दीचा मेळा असलेल्या कुर्ला स्थानकात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. या ठिकाणी हार्बर, मध्य लाइनवरील प्रवाशी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. परळ येथील घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासाने सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची निर्माण होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

धक्कादायक ! राज्याचा आकडा ६३५ वर पोहोचला

News Desk

परळमधील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

swarit