HW News Marathi

Related posts

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा

News Desk

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

Aprna

एसटी – टेम्पोच्या धडकेत नऊ ठार; १० गंभीर जखमी

News Desk
महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit

मुंबई | एसटीने प्रवास करणे सर्वांच आवडते. परंतु हा प्रवास येत्या १५ जूनपासून महाग होणार आहे. एसटीच्या तिकीटात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. सतत इंधनच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर प्रचंड ताण येत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे रावते यांनी सांगितले.

इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण येत होता. त्यामुळे एसटी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु प्रवाशांवर ही आर्थिक ताण येऊ नये म्हणून १८ टक्के भाडेवाढ करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

 

संबंधित बातम्या | मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात, 8 ते 10 जूनला अतिवृष्टीचा इशारा..

Related posts

दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? सामनातून अजित पवारांवर टीका

News Desk

मंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा

News Desk

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोले

Aprna