HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता ‘पोलीस काकां’वर

पुणे : शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी आता ‘पोलीस काकां’वर सोपविण्यात आली आहे.शाळा, महाविद्यालय परिसरातील टिंगल टवाळी, भाईगिरी, रॅगिंग, अमली पदार्थांची विक्री आदीला आळा घालण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या १९५ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीसकाका म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा फोन आल्यास काका तत्काळ मदतीला धावणार आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. शहर व परिसरात ११८० शाळा आणि महाविद्यालये असून अनेकदा गैरप्रकार होत असतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालय व शाळेसाठी पोलीसकाका म्हणून एक वरिष्ठ कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. त्याचा मोबाल क्रमांक व फोटो शाळेबाहेर लावण्यात येणार असून शाळांमध्ये त्या त्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी या उपक्रमांची माहिती देणार आहेत.

उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नोडल आॅफिसर म्हणून काम पाहिले. शाळा किंवा महाविद्यालयाकडूनही एक शिक्षक किंवा प्राध्यापक नोडल आॅफिसर म्हणून काम पाहिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये प्रभावीपणे हा उपक्रम राबविण्याकडे भर देतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपादरम्यान बेस्टचे १९.८८ कोटींचे नुकसान

News Desk

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna

उद्धव ठाकरेंच्या हस्ते नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण

Gauri Tilekar