HW News Marathi
मुंबई

केईम रुग्णालयाचे छत कोसळून रुग्ण किरकोळ जखमी

मुंबई | परळ स्थित असलेल्या महापालिकेच्या के इ एम रुग्णालयात बुधवारी रात्री एम हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या मजल्यावर डायलिसिस विभागाच्या छताचे प्लास्टर अचानक कोसळले. अचानक हे छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे

डायलेसिस विभागतील 2 रुग्ण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर जखमीना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले या घटनेत हॉस्पिटलचे 2 कर्मचारी ही किरकोळ जखमी झाले.

या संदर्भात अधिक माहिती देताना केईएम रुग्णालयाचे डीन अविनाश सुपे म्हणाले, प्लास्टर आणि एसी सिलिंग पडल्यामुळे 2 रुग्ण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या ठीक असून त्यांना वेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या ठिकाणी डायलिसिस विभागाचे काम काज सुरू केले असून कोसळला छत येत्या 3- 4 दिवसात पूर्वत तयार करून सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईजवळ जहाजावरील तीन खलाशांचा मृत्यू

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk

मशिदीवरील भोंग्याविरोधात सोनू निगमचा नाराजीचा सूर

News Desk