HW News Marathi
मुंबई

मालवानीत इमारतीचे छत कोसळले, दोन जण जखमी

मालाड मालवनी परिसरातील 44 वर्ष जुनी इमारतीचे छत कोसळले आहे यात दोन जण जखमी झाले आहे. हि घटना शानिवारी घडली. जखमीना रूग्णालयता दाखल करण्यात आले.

अधिक माहिती अशी की, मालवनी गेट क्र 3 येथे 44 वर्ष जुनी तीन मजली इमारत वंदना सदन, जुने पोस्ट ऑफिस बिल्डिंग आहे ही बिल्डिंग 1974/75 साली बांधली होती. इमारत जीर्ण झाल्याने येथून पोस्ट ऑफीस तेथून हलवले होते शनिवार 11.30 वाजता फ्लॅट क्र 03 येथे राहणारे मोहम्मद शेख व पत्नीव दोन मुले जेवण करताना छत कोसळलं यात साडे तीन वर्षांचा मुलगा स्लॅब सह दुसऱ्या मजल्यावर खाली पडले यात ते जखमी झाले आहेत. या इमारतीचा पुनर्विकास करण्यासठी बॉम्बे स्पेसिअस डेव्हलेपमेन्ट या कंपनील 2011 साली दिले होता मात्र विकासक कंपनीचे मालक रफिक अहमद सय्यद यांनी नुसता करार करून हा प्रकल्प दुसया विकासकाला विकण्यासाठी काढला मात्र तस झालं नसल्याने ही इमारतची दुरावस्थेत झाली आहे. इमारत कोणत्याही क्षणी पडू शकते यामुळे स्थानीक रहिवाशी भयभीत झाले आहेत. सध्या या इमातीत 12 कुटूंब राहत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई

News Desk

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk

मध्य रेल्वे विस्कळीत

News Desk