HW News Marathi
मुंबई

भरधाव दुचाकी टेम्पोला धडकून तीन तरुण ठार

पिंपरी: भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती टेम्पोवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण ठार झाले. पुणे- बंगळुरू महामार्गावर बावधान येथे मंगळवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.अपघातातील तिघेही मूळचे बिहारचे असून एमबीएच्या शिक्षणासाठी ते पुण्यात राहात होते.

विपुल राजसिंग (२५), अमन राज (१९) आणि अश्विन अमरकुमार अगरवाल (१८) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक शिवा सोमनाथ राठोड (३०,रा. मालखेडा, ता. हवेली, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विपुल, अमन आणि अश्विन हे तिघे मूळ बिहारचे रहिवासी कोथरूड येथील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. मंगळवारी रात्री ते दुचाकीवरून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. विपुल दुचाकी चालवत होता. परतत असताना बावधान येथे विपुलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते – शरद पवार  

News Desk

गुढीपाडव्याच्या आधी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna