HW News Marathi
मुंबई

शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई | शेअर बाजारात शुक्रवारी सेंसेक्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे शेअर बाजारात खळबळ माजली आहे. शेअर बाजारा दुपारच्या दरम्यान अचानक सेंसेक्स २७९.६२ अंकांनी म्हणजे ७५ टक्क्यांनी कोसळला. राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टी ९१.२५ अंकांनी म्हणजे ८१ टक्क्यांनी घसरल्याने शेअर बाजार ११,००० अंशांच्या खाली आला आहे. सेंसेक्सच्या घसरणीमुळे बँकिंग आणि फायनान्स मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

डीएचएफएलचे सुमारे ५० टक्के आणि यस बँकेच्या शेअर्समध्ये ३० टक्के घसरण झाली आहे. यस बँकेचे सीईओ राणा कपूर यांचा कार्यकाळ मुदतीपूर्वीच संपविण्याचा आरबीआयच्या निर्णयाचा बँकेच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. शेअर बाजार आज सुरू होताच सेन्सेक्स ३०५.८८ अंकांनी वाढत ३७,४२७ अंशावर व्यवहार करत होता. तर निफ्टी ८४ अंकांनी वाढत ११,३१८ वर खुला झाला होता. मात्र, दुपारी त्यात घसरण झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सत्तेसाठी लांडगे एकत्र आले, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका

News Desk

मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी, पालिका हतबल

News Desk

लव्हगुरु सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk
देश / विदेश

अमेरिका-चीन व्यापार संघर्ष पुन्हा चिघळणार ?

Gauri Tilekar

वॉशिंग्टन | ‘अमेरिकेने चीनवरील लष्‍करी विमान खरेदी संबंधीची बंदी उठवून आपली चूक सुधारावी,’ अशी सूचना वजा धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे. गेल्‍या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांच्या बिघडलेल्‍या संबंधामुळे आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा या दोन्ही देशांतील व्यापार संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, चीनने मोठ्या प्रमाणात केलेल्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे चीनवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या बंदीमुळे चीनला अमेरिकेच्या अधिकारक्षेत्रात परवान्यासाठी अर्ज करता येणार नाही. काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बिघडलेल्या व्यापार संबंधावर तोडगा काढण्यासाठी चीनसमोर चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. “दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चा होत आहे. व्यापार संघर्ष हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा नाही,” असे चीनचे वाणिज्यमंत्री गांव फेंग यांनी म्हटले होते.

अमेरिका आणि चीनमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे अमेरिकेने आंतराष्‍ट्रीय संबंधाच्या प्राथमिक मुल्‍यांचे उल्‍लंघन केले असल्याचा आरोप चीनच्या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते शुआंग यांनी केला आहे. तर दुसरीकडे ‘चीनने अमेरिकेच्या कायद्याचे उल्‍लंघन करून रशियाच्या शस्‍त्रास्‍त्र कंपनीबरोबर सौदा केला असल्याचा पलटवार अमेरिकेने केला आहे.

Related posts

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk

मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

News Desk

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna