HW News Marathi
मुंबई

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

मुंबई | दादर स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादरच्या फलाट क्रमांक १ वर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे परळ ते माटुंगा दरम्यान पाच ते सहा लोकल एका मागोमाग एक थांबल्या आहेत. यामुळे प्रवासी रुळांवर उतरून चालत जात असतानाचे चित्र दिसत आहेत. रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची ही आजच्या (२६ एप्रिल) दिवसभरातील दुसरी घटना आहे.

काही वेळापूर्वीच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलला अपघात झाल्याची घटना घडील आहे. हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. ही घटना फलाट क्रमांक एकवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाली असून लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. परंतु, या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र फलाट क्रमांक एकवरील वाहतून काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | पथनाट्याच्या माध्यमातून पारंपारिक सणांची जनजागृती

News Desk

मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने

News Desk

उपजिल्हाधिकारी कारले यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन – बबनराव घोलप

News Desk