HW News Marathi
देश / विदेश मुंबई

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | “राज्यातील वंदे भारत या दोन एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस आज (10 फेब्रुवारी) मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोकार्पण सोहळ्यात मुंबई ते सोलापूर ही पहिली तर मुंबई ते शिर्डी दुसरी हिरवा कंदील दाखविला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “राज्यातील वंदे भारत या दोन रेल्वे एक्स्प्रेसमुळे मुंबई-पुणे ही दोन आर्थिक केंद्रे आणि धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. या वंदे भारत या एक्स्प्रेसमुळे गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर व तुळजापूर या ठिकाणी जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमुळे शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि शनि शिंगणापूर या धार्मिक स्थळांना भाविकांना आरामदायी-आलिशान प्रवास होणार आहे.

“खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालयात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की, अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटे आणि पाच मिनिटे थांबेल का पाहा. आणि वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही?, कधी येणार?यावर चर्चा करताना काही दिवसापूर्वी दिसत होते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

 

 

Related posts

कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार

News Desk

Parel Fire | बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी

News Desk

आजही गोडसे जिवंत आहेत, जयंत पाटलांकडून जामिया गोळीबारचा निषेध

swarit