HW News Marathi
मुंबई

सायन स्टेशनजवळ एलबीएस मार्गावर आग, जिवीतहानी नाही

मुंबई | सायन स्टेशनजवळ जाणार्‍या एलबीएस मार्ग रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या पदपथावरून जाणाऱ्या वायरींना रात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहन चालकांमध्ये व शेजारी लोकांमध्ये असणाऱ्या भीतीचे वातावरण पसरले आहे. आग लागल्यानंतर स्थानिकांनी बेस्ट व अग्निशमन दलांना संपर्कशी केला. घटनास्थळी अग्निशमन दल व बेस्ट कर्मचारी येऊन विद्युत पुरवठा थांबवत त्यांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.

पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ सुरू झाले. रस्त्यावरील सर्वच पथदिव्यांची वीज खंडीत केल्यामुळे तात्पुरता रस्ता अंधारमय झाल्याचे पहावयास मिळाले. मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या दिवशीच पाऊस शांत असताना ही आगीची घटना घडली. त्यामुळे मोठी कोणती दुर्घटना घडली नाही. पदपथावरून जाणाऱ्या या अचानक वायरींचा स्पार्क होवून ठिणग्या उडाल्या व काही क्षणातच आग निर्माण झाली. या आगीमुळे रस्त्यावरील सुरूवातीला तीन-चार पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. आता हा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेतील अंबरनाथ-बदलापूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे

News Desk

लालाबागच्या राजाचा दरबार आता सरकारच्या ताब्यात

swarit

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

News Desk