HW News Marathi
मुंबई

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

मुंबई | हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ही रविवारी पुर्णपणे ठप्प असेत. परंतु पहिल्यांदा हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे हार्बर प्रवाशांमध्ये उत्साहचे वातावरण आहे. तसेच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-नेरूळ मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रपासून ब्लॉक घेणार आहे.

मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. या काळात लोकल फेऱ्या परळ-दिवा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविल्या जातील. यामुळे लोकल फेऱ्या २० मिनिटे उशीराने धावणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जलद लोकलला नेहमीच्या थांब्यांसह अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे.

ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी-नेरूळ अप -डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ब्लॉक आहे. या काळात लोकल बंद राहणार असून या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही. मात्र वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ते रविवारी रात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा ब्लॉक आहे. डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्री १ वाजून २५ मिनिटे ते पहाटे ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत कामे करण्यात येतील.

रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे दिव्यातून धावणार दादर-रत्नागिरी आहे. ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. यामुळे (५०१०३) दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून रवाना होणार आहे. पॅसेंजरच्या प्रवाशांसाठी दादर स्थानकातून विशेष लोकल चालवली जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk

नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणप्रत पडतळणी प्रकरणाची सुनावणी 28 डिसेंबरला होणार

Aprna

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk