HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त अस्थापना आणि प्रशासनासाठीच्या खर्चाची केलेली बेगमी -सचिन अहिर

मुंबई | महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त अस्थापना आणि प्रशासनासाठीच्या खर्चाची केलेली बेगमी आहे. करदात्याच्या पैशातून चालवलेली ही उधळपट्टी म्हणजे सर्वसामान्य करदात्या मुंबईकराची फसवणूक असल्याची तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर बोलताना अहिर यांनी विविध योजनांसाठी मोठमोठ्या तरतूदींपेक्षा अंमलबजावणीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. काल मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना अहिर म्हणाले की, एकूण अर्थसंकल्पहा २७ हजार २५३ कोटींचा असून त्यापैकी तब्बल १७ हजार ७२३ कोटी अस्थापना आणि प्रशासकीय बाबींवर खर्च केले आहेत. काही चांगल्या योजनांसाठी तरतूद केल्याची बाब जरी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असली तरीही गेल्या दोन वर्षांतील नागरी कामांचा आढावा घेतला तर अर्थसंकल्पाची योग्यरित्या अंमलबजावणी मात्र झालेली नाही.

उदाहरणच द्यायचे झाले तर मुंबई शहरआणि उपनगरात तब्बल १४६ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबते, मात्र अशा धोकादायक ठिकाणांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात फक्त ५५कोटींची तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यसाठी अधिकची तरतूद जरी प्रस्तावित केली असली तरी महापालिकेच्यारुग्णालयात मुलभूत आरोग्य सुविधा आजही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीचाघोळ तर कायमचाच असल्याचेही मा. अहिर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठी तरतूदकेल्याचा दिखावा केला जात आहे. मात्र या विभागातील बेफाट भ्रष्टाचारामुळे इथेही सुविधांची वानवा आहे.

हे सर्व चित्र पाहता हाअर्थसंकल्प नेमका कोणासाठी असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. कोणताही अर्थसंकल्प फक्त कागदावर दिसायला चांगला असून चालतनाही तर त्याची अंमलबजावणी योग्यरित्या व्हायला हवी. महापालिका कर्मचाऱ्यांचा विचार या अर्थसंकल्पात अजिबात केलेला नाही.महापालिका अधिकाऱ्यांच्या व्यायामशाळेसाठी पाच कोटींची तरतूद केली, मात्र ही व्यायामशाळा अजून अस्तित्वातच नाही. मुंबईतील उच्चभ्रुंची वस्ती असलेल्या कफ परेडमध्ये खेळाच्या मैदानासाठी तरतूद आहे, मात्र शहर आणि उपनगरांत अस्तित्वात असलेल्याखेळाच्या मैदानांकडे दुर्लक्ष झाले आहे. शैक्षणिक क्षेत्राबाबतही अशीच स्थिती आहे. टॅबची

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

News Desk

मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत !

News Desk

पाकिस्तान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सैराटला स्थान

News Desk