HW Marathi
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तिन्ही रेल्वे मार्गावरी मेगाब्लॉक रद्द

मुंबई । भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८वी जयंती निमित्ताने आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या तिन्ही मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक जयंती निमित्ताने रद्द करण्यात आल्याने प्रवासांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेगाब्लॉक रद्द झाल्याने प्रवासी रविवारी नियोजित लोकल पकडून इच्छित ठिकाणी जाऊ शकतील.

पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक तांत्रिक बाबीमुळे रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर
मध्य रेल्वे मार्गावर रविवार १३ एप्रिल रोजी मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यासह बदलापूर आणि कर्जतदरम्यान पायाभूत कामासाठी विशेष ब्लॉक घेतला होता. त्यामुळे बदलापूर ते कर्जत लोकल रद्द केल्या होत्या. परंतु आता पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर घेण्यात आलेला जम्बोब्लॉक आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Related posts

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk

‘ट्री गणेशा’च्या रूपात बाप्पा राहणार आपल्यासोबत

धनंजय दळवी