HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

मुंबई- 26 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात झालेल्या महाभीषण पावसाची आज पुन्हा पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी पाणी भरले गेल्याने मुंबईचे रुपांतर तुंबईपुरात झाल्याचे पाहवयास मिळाले.

लालबाग,हिंदमाता, परळ भागात पाणी साचले असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचे स्वरुप आले आहे. गेल्या 24 तासात दोनशेहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून नेहमी धावणाऱ्य़ा मुंबईचा मंदावल्याचे चित्र होते. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, कर्मचा-यांना लवकर घरी सोडण्यात आले आहे. जोगेश्वरी, चर्चगेट जंक्शन आणि सात रस्ता येथे झाड पडल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

दादर टीटीजवळ पाणी साचल्याने वाहूतक कोंडी झाली आहे. वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचले असून सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरीमधील मरोळ परिसरातील इमारतीत बिबट्या घुसला

News Desk

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk