HW News Marathi
मुंबई

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- राम शिंदे

मुंबई, लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण मंत्री राम शिंदे यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले.

लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने यासंबंधीचे निवेदन मंत्री राम शिंदे यांना देण्यात आले. काल मंत्रालयात आयोजित बैठकीत शिंदे बोलत होते.

राज्य शासनाने लिंगायत समाजातील 9 पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये तर एका तीन पोटजातींचा समावेश विशेष मागास प्रवर्गात केला आहे. लिंगायत समाजातील इतर पोटजातींचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल मिळण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, सहसचिव गावित, समितीचे समन्वयक ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष सुनील रुकारी, नरेंद्र व्यवहारे, माजी आमदार मनोहर पटवारी आदी यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

कुर्ला एस.टी. आगारामध्ये ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन

News Desk

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

News Desk