HW News Marathi
मुंबई

आज मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज (७ एप्रिल) रेल्वेची सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगादरम्यान सकाळी १०.३७ वाजल्यापासून ते दुपारी ३.३१ वाजेपर्यंत धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकांवर लोकल थांबतील.

पश्चिम मार्गावर माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची नववर्ष स्वागत यात्रा

News Desk