HW News Marathi
मुंबई

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर!

मुंबई : काल दिवसभर अक्षरश: झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासून काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तुंबलेले पाणी ओसरत असून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे काल दिवसभराच्या पावसाने विस्कटलेली मुंबईची घडी पुन्हा बसत आहे. मुंबईचे जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ शकते.

सीएसटीहून कल्याणला जाणारी पहिली लोकलआज सकाळी ७.३० च्या दरम्यान रवाना झाली. त्यामुळेरात्रभर अडकलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला, तर हर्बर मार्गावरील वाहतूक ९ वाजून ३ मिनिटांनी सुरू झाल्याने चाकरमान्यांचा जीव भांड्यात पडला. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यानची लोकलची वाहतूक पाण्यामुळे संथ गतीने सुरू आहे. ठाणे-वाशी ही ट्रान्स हार्बरची वाहतूक मात्र सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी ओसरू लागल्यानं पूर्व आणि पश्चिम महामार्ग मोकळे झाले आहेत. पूर्व महामार्गावर सध्या कुठेही ट्रॅफिक जाम नाही. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक रात्री १० वाजताच सुरू करण्यात आली होती. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरू झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

वाहनांच्या मार्गक्रमणाच्या खात्रीसह पारदर्शकता जपणेही होणार सुलभ

Gauri Tilekar