HW Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सगल चौथ्या दिवशी देखील कायम आहे. बेस्टचा हा संप या दशकातील सर्वात दीर्घकालीन मानला जात आहे. यापूर्वी १९९७ साली बेस्टचा संप तीन दिवस लांबला होता. या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. गुरुवारी (१० जानेवारी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर, पालिका आयुक्त आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत महापौर बंगल्यावर झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारी (११ जानेवारी) संपच सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी  ठाकरे आणि महापौरांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे कामगार संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले. बेस्ट कर्मचाऱ्यांची आज पुन्हा एकादा लोअर परळ येथील शिरोडकर हॉलमध्ये बैठक होणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे.

या बैठकीमध्ये महापालिकेतील विलीनीकरणाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. कामगारांचे पे ग्रेडबाबत पैसे नसल्याचे कारण देत लेखी आश्वासनही दिले गेली नसल्यामुळे संपावर तोडगा निघाला नाही. या संपात रिक्षा-टॅक्सी, खासगी बस सेवा आपले खिसे भरून घेत आहेत. बेस्ट उपक्रमातील ३० हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (७ जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.

विद्युतम पुरवठा विभागाचा पाठिंबा

विद्युत पुरवठा विभागाचाही पाठिंबा दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभागही संपात सहभागी झाला आहे. द इलेक्ट्रिक युनियनने संपाला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • बेस्टचा ‘क ‘अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ ‘अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
  • २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
  • एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
  • २०१६-१७ आणि १७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी

Related posts

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

अपर्णा गोतपागर

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

अपर्णा गोतपागर

शेतीतील गुंतवणुक वाढवुन शेतक-यांना आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प राज्यमंत्री -सदाभाऊ खोत

News Desk