HW News Marathi
मुंबई

टोलनाक्यावर प्रवाशाला ८७ हजाराचा फटका

मुंबई खालापूर टोल नाक्यावर कार्ड स्वाईप करणं पुण्यातील सेल्स मॅनेजरला भलतंच महाग पडलं आहे. टोल नाक्यावर कार्ड स्वाईप केल्याने दर्शन पाटील यांना ८७ हजारांचा फटका बसला आहे. टोल नाक्यावर २३० रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून ८७ हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दर्शन पाटील शनिवारी आपल्या घरी पुण्याला जात असताना हा प्रकार घडला आहे. यावेळी खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबले असताना हा प्रकार घडला आहे. संध्याकळी सहा वाजून २७ मिनिटांनी मी खालापूर टोल नाक्यावर २३० रुपयांचा टोल भरला. यानंतर मला लगेच पैसे डेबिट झाल्याचाही मेसेज आला. पण रात्री आठ वाजून ३१ मिनिटांनी मला माझ्या कार्डवरून २० हजार रुपयांची खरेदी केल्याचा मेसेज आला. यानंतर काही मिनिटातच मला डेबिट कार्डवरुन खरेदी केल्याची सहा मेसेज आले’, अशी माहिती दर्शन पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा संप मागे

News Desk

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

स्विफ्ट कारमधील तिघांचा जळून मृत्यू.. घातपाताची शक्यता ?

News Desk