HW News Marathi
मुंबई

रविवारीचा मेगाब्लॉक शनिवारीच 

मुंबई । रेल्वेच्या डागडुजी व देखभालीचे काम दर रविवारी केले जाते. परंतु ते काम आज (शनिवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे आज (६ ऑक्टोबर) मध्यरात्री पासून डागडुजीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटे पर्यंत तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे लांब पल्यांच्या गाड्यावर परिमाण होणार असून सहा वाजल्यानंतर रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावणार आहेत. तर काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

पहा कोणत्या वेळेत व ठिकाणी असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वे :- माटुंगा ते मुलुंडच्या स्थानकादरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे दादर- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस , सीएसमटी भुसावळ पेसेंजर , इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या माटुंगा व मुलुंडच्या दरम्यान धीम्या गतिकडे वळवल्या जातील

हार्बर मार्ग :- हार्बर मार्गावर सीएसटीते कुर्ला व माहीमपर्यंत आज १.२० ते ६.२० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसमटी ते वडाळा पर्यंत तसेच पनवेल-बेलापूर-वाशी मार्गावर ४. ३२ ते ६, ४६ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसमटी पर्यंत पहाटे ४.३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा खंडित करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे :- पश्चिम मार्गावर मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ या दोन्ही स्थानकंपर्यंत मध्यरात्री १२ ३० ते सकाळी ४ ३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक दरम्यान विरारला जाणाऱ्या लोकल लोअर परेल, महालक्ष्मी ,माहीम, माटुंगा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या माहीम, माटुंगा, लोअर परेल महालक्ष्मी या स्थानकांवर थांबणार नाहीत. मेगाब्लॉकमुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला जखमी

News Desk

दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

हजारों कोटींची जमीन खाजगी कंपनीला दिली फक्त 54 कोटीत, काँग्रेसच्या मंत्र्यांचा प्रताप  

News Desk