HW News Marathi
मुंबई

उद्या या वर्षातला शेवटचा मेगाब्लॉक 

मुंबई । मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची मध्यरेल्वेसाठी दर रविवारी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण यंदा रविवारी ३० डिसेंबर रोजी ह्या वर्षातील हा शेवटचा मेगाब्लॉक असणार आहे. २०१८ हे वर्ष संपून २०१९ वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन संकल्प नवीन विचार श मुंबईकर २०१९ मध्ये पदार्पण करणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणा तसेच रुळांच्या कामांसाठी उद्या रविवार 30 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.40 वा.पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.37 वा. पासून दुपारी 3.31 वा. पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालविली जातील. तसेच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबून माटुंगाहून धीम्या मार्गावर चालविली जातील. कल्याणहून सुटणारी अप जलद/सेमी जलद मार्गावरील लोकल आपल्या थांब्या व्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर आपल्या शेवटच्या थांब्यावर 15 मिनिटे

उशिरा पोहोचतील.

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही सकाळी 11 ते दुपारी 3.40 वा. पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.34 वा. पासून दुपारी 3.08 वा. पर्यंत सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणार्‍या सर्व डाऊन हार्बर मार्गावरील लोकल तसेच सकाळी 10.21 वा.पासून दुपारी 3 वा.पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणार्‍या सर्व अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वा. पर्यंत ट्रान्स हार्बर, मेन मार्गावरून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

‘परे’चा वसई-भाईंदर

दरम्यान रात्रकाली ब्लॉक

रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणांच्या कामासाठी पश्चिम रेल्वेतर्फे शनिवार 29 डिसेंबर 2018 आणि रविवार 30 डिसेंबर 2018 च्या मध्यरात्री वसई रोड-भाईंदर स्थानकांच्या मध्य अप-डाऊन जलद मार्गावर 12.30 वा.पासून पहाटे 4.00 वा.पर्यंत तब्बल साडेतीन तासांचा रात्रकाविन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल बंद राहतील. तसेच रविवार 30 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक राहणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

Aprna

सायन स्टेशनजवळ एलबीएस मार्गावर आग, जिवीतहानी नाही

News Desk