HW Marathi
मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट

मुंबई | मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले असून मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  मुंबईतील सायन-माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे.

तसेच उपनगरातील विक्रोळी-कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वळविण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे पाठोपाठपश्चिम रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाशी त सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या वसई-विरारदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कसारा आणि कर्जत वाहतूक सुरू आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या ४८ तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविली आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.

 

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

धनंजय दळवी

केईम रुग्णालयाचे छत कोसळून रुग्ण किरकोळ जखमी

News Desk

खार रोडवर पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला

News Desk