मुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक आज (५ ऑगस्ट) विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या खडवली व वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान कसाऱ्याकडे जाणाऱ्या रूळावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक गाड्या डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा स्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत.
CR Updates:
Traffic between Badlapur-Karjat resumes.
CSMT -KJT Sch 04:48
KJT-CSMT Sch 05:53
Thane- KJT sch 05:00
— Central Railway (@Central_Railway) August 6, 2019
मालगाडीच्या मागे एक एक्स्प्रेस रखडल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे कर्जतहून नेरळला येणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरवून दुसऱ्या लोकलने पाठवण्यात आले आहे. तसेच ती लोकल कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे.
हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असणारी बदलापूर-कर्जत लोकल सेवा पुन्हा पूर्वपदावर आली आहे. मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.