HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बिघाडामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. डोंबिवली, कल्याण स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अप मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू असून रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळी सुरू आहे.

यामुळे कल्याणकडून येणाऱ्या स्लो लाईनवरील गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या १५ ते २० मिनिटाने उशिरा सुरू असून याचा परिणाम दिवसभराच्या वेळापत्रकावर पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने रुळ दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. लवकरच वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

Adil

महापालिकेचे अजब तर्कट, त्या निवेदिकेचा मृत्यू वाऱ्यामुळे

News Desk