HW News Marathi
मुंबई

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ऑडिट झाल्यास सत्य बाहेर येईल !

मुंबई | मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ऑडिट झाल्यास सत्य बाहेर येईल आणि सध्याच्या कार्यरत कार्यकारिणीचा बुरखा फाटला जाईल, असा दावा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बचाव कृती समितीने केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी मराठी भाषा आणि मराठी ग्रंथसंग्रहालय वाचविण्याचे आवाहन करण्यासाठी शनिवारी (२५ जानेवारी) मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बचाव कृती समितीचे सुधीर हेगिष्टे, धनंजय शिंदे आणि अनिल गलगली यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. सुधीर हेगिष्टे यांनी सांगितले की, निवडणुका कागदावर होत असून या बेकायदेशीर आहेत. त्यामुळेच धर्मादाय आयुक्तांलयात झालेला कुठलाही बदल दिसून येत नाही आणि मान्यता मिळाली नाही. तर धनंजय शिंदे म्हणाले की, उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. मराठीच्या प्रश्नांवरती राज्यातील सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ऑडिट झाल्यास सत्य बाहेर येईल. प्रत्येक काम ही निविदा देऊन केले जात नाही. त्यामुळे संस्थेला नुकसान होत असून वैयक्तिक लाभासाठी लोक धडपडत असल्याचा आरोप यावेळी अनिल गलगली यांनी केला आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रालयाच्या परिसरात येत्या सोमवारी म्हणजेच २८ जानेवारी रोजी सभासद, वाचक, साहित्यिक, कर्मचारी, साहित्य प्रेमीची सभा आयोजित केली गेली आहे. या सभेत समाजसेविका मेधा पाटकर, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, पत्रकार हेमंत देसाई, धनंजय शिंदे, अनिल गलगली, यशवंत किल्लेदार उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधक एकत्र आले तरही भाजपचा विजय निश्चित | अमित शहा

swarit

मुंबईत तीनशे किलो टोमॅटोवर दरोडा!

News Desk

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

News Desk