HW News Marathi
मुंबई

ठाण्यात सॅटिक पुलावर दोन बसची धडक

ठाणे | ठाणे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या सॅटिक पुलावर ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर या दोन्ही एसटी बसची धडक झाली आहे. यात दोन्ही एसटी बसच्या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या बसचा गिअर बॉक्स जॅम झाला होता. त्यामुळे बसला ब्रेक लागला नसल्यामुळे एसटी बसही थेट सॅटिक पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. या बस मागून येणारी ठाणे-शहापूर एसटीने ठाणे-भिवंडी एसटीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे, कल्याण उपनगरांचा मुंबईशी संपर्क तुटला

News Desk

मुंबईतील धर्म व्हीला इमारतीमध्ये भीषण आग

News Desk

केईम रुग्णालयाचे छत कोसळून रुग्ण किरकोळ जखमी

News Desk