HW News Marathi
मुंबई

झाड कोसळून सातरस्ता येथे दोन गाड्यांचे नुकसान

मुंबई | मुंबईसह उपनगरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळ पासून उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे परंतु सोमवारी मुंबईमध्ये लागबाग, परळ, दादर, वरळीसह शहरात पावसाने हजेरी लावली. सायन, हिंदमाता यांसारख्या काही ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी गटार तुंबल्याचेही पहायला मिळाले.

तसेच सातरस्ता योथील केशव राव खाडे मार्ग येथे झाड कोसळून २ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर सातरस्था पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन माहिती घेतली. झाड पडल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ,महानगरपालिकाचे कर्मचारी तातडीने पाऊस पडत असतानाही उपस्थित राहिले होते.

तसेच स्थानिक नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाअध्यक्ष मारूती दळवी यांनी वाहतूकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून झाड जागेवरुन हटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

पश्चिम रेल्वेच्या महिलाडब्यांचे आकर्षक रुप पाहिले का…

News Desk

खार रोडवर पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला

News Desk
मुंबई

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

मुंबई | विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला सोमवारी सायंकाळी अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला असून उज्ज्वल निकम पुण्याहून मुंबईला येत असताना हा अपघात झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सुदैवाने उज्ज्वल निकम यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली फुडमॉलसमोर झालेल्या या अपघातात निकम यांच्या ताफ्यातील एका गाडीला झालेल्या अपघात 2 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत तर उज्ज्वल निकम सुरक्षित असून त्यांना कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related posts

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

गोरेगावमध्ये इमारत कोसळून १ मृत्यू, ८ जण जखमी

News Desk

स्वत:च्या मृत्यूवरही त्यांनी रेखाटले होते व्यंगचित्र

News Desk