HW Marathi
मुंबई

२ तास उलटून गेले तरी चर्चा सुरूच, बेस्टचा संप आज तरी मिटणार का ?

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आज (१० जानेवारी) तिसरा दिवस आहे. हा संप मिटविण्यासाठी शिवसेनेकडून विशेष प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या २ तासांहूनही अधिक वेळ महापौर बंगल्यावर चर्चा सुरु आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास सुरू झालेली ही चर्चा आता २ तास उलटून गेले तरी सुरूच आहे. या चर्चेला बेस्ट कृती समितीचे शशांक राव हे या बैठकीला येणार आहेत.

महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, बेस्ट समितीचे आशिष चेंबूरकर, खासदार अनिल देसाई या चर्चेसाठी उपस्थित आहेत. या चर्चेतून उद्धव ठाकरे या संपावर काही तोडगा काढतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

News Desk

करी रोड-एल्फिन्स्टन रोडवर शिवसेनेचे आंदोलन

धनंजय दळवी

दाऊदच्या कोट्यवधी संपत्ती विकत घेण्यासाठी 12 जण इच्छुक

News Desk