HW News Marathi
मुंबई

विद्याविहार स्थानकाजवळ अपघात, दोन जण जखमी

मुंबई | शुक्रवार सकाळी मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकाजवळ ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. सकाळी ही मोठी दुर्घटना झाल्यानंतर परिसरात बराच वेळ लोकांचा गोंधळ पहायला मिळाला. विद्याविहार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील तिकीट खिडकीजवळच्या रस्त्यावर हा ट्रक पलटला. विटांनी भरलेल्या या ट्रकखाली पाच मजूर अडकले होते.

मात्र या मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारच्या सुमारास विटांनी भरलेला हा ट्रक विद्याविहार स्थानकातील तिकिटी खिडकीजवळ उलटला होता. टायर फुटल्याने हा ट्रक उलटला असावा असा प्राथमिक अंदाज बघ्यांकडून वर्तविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

News Desk

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

पुढच्या काळात फुटाफूट नको म्हणून राज ठाकरे सरसावले  

News Desk