मुंबई | माझगाव येथील जीएसटी भवनाला सोमवारी (१७ फेब्रुवारी) लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या भीषण आगीचे प्रसंगावधान राखत शिपाई कुणाल जाधव यांनी आपला राष्ट्रध्वज सुरक्षित खाली उतरवला. आपल्या जीवाची पर्वा न करता देशाप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि शौर्याचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. कुणाल जाधव यांच्या देशप्रेमाची दखल घेत सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कुणाल जाधव यांचा सत्कार केला.
मुंबई येथील #GST भवनच्या आगीत जीवाची पर्वा न करता पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत चढून जाणारे आणि #तिरंगा सुखरूप आणणारे कर्मचारी कुणाल जाधव यांना आज सायंकाळी मी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून घेतले व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा छोटेखानी सत्कार केला.@CMOMaharashtra @OfficeofUT pic.twitter.com/DbIpDnBzZw
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 19, 2020
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिपाई कुणाल जाधव यांच्या देशप्रेमाची बातमी वाचल्यानंतर ट्विटरवरून कौतुकही केले होते.
तिरंगा वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या या बहाद्दराला त्रिवार सलाम!#Tiranga pic.twitter.com/mdNPdoUIqb
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 18, 2020
अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कुणाल जाधव यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी शाल, श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची प्रतीमा देत सन्मानीत केले. जाधवांच्या सत्कारादरम्यान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार आदी मंत्रिही उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.