HW News Marathi
मुंबई

सामान्यांमधील असामान्य व्यक्तीमत्व | जय श्रृंगारपुरे

मुंबई | शहरात रहाताना प्रत्येकजण वेगवेगळी स्वप्न उराशी बाळगून जगताना दिसतो. परंतु दादर मध्ये रहाणारा एक सुशिक्षित उच्चभृ तरुण व्यावसायिक दादरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्याची स्वप्न पहायतोय. हे स्वप्न साकार करण्यासाठी चक्क प्रत्येक रविवारी दादरचा समुद्र किनारी कचरा जमा करण्याचे काम करतोय हे ऐकून कुणालाही धक्का लागेल. पण होय हे सत्य आहे 1 एप्रिल 2017 ला स्वतापासून सुरुवात करत अनेक लोकांना एकत्र करत जय ने दादरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी मोहीमेत सहभागी करुन घेतले.

जयच्या या स्वच्छता मोहीमेत दादर विभागातील स्थानिक रहीवाशी मुंबई शहरातल्या अनेक शाळांचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक संस्था सिनेसृष्टीतले कलाकार राजकीय नेते आदि लोक या मोहीमेत आतापर्यंत सहभागी झाले आहेत. दादर जी नॉर्थ विभागातील महापालिका कर्मचारी तसेच आयुक्तांनी जयच्या कामाचे भरभरुन कौतुक केले आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट देखील ट्विट करुन जयच्या कामाची दखल घेतली आहे.

सुरुवातीला स्वतापासून स्वच्छतेला सुरुवात केलेल्या जयचे काम पाहून दर रविवारी दादरच्या किना-यावर लोक जमू लागले आणि याच समुद्र शेकडो लोक एकत्र येत किनारा स्वच्छ करताना पहायला मिळतात. कमी वेळात अनेक लोकांशी जोडून घेत जयने सुरु केलेला हा उपक्रम सर्वांसाठी नक्कीच कौतुकाचा विषय ठरलाय एवढे नक्कीच. दादरसारख्या विभागात रहाणारा उच्चशिक्षित तरुण कचरा वेचत जेव्हा स्वच्छतेचा संदेश देतो तेव्हा नक्कीच कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही.

या स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या जय फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. संस्थेअंतर्गत सध्या जय श्रृंगारपुरे यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

आपला परीसर तसेच समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे हे एक मुंबईकर म्हणून आपले प्राथमिक कर्तव्य असल्याचे जय सांगतो. जास्तीत जास्त पर्यावरण पुरक वस्तूंचा वापर करा निर्माल्य निर्माल्य कलशात टाका तसेच अनेक सुचना वारंवार जय फाउंडेशनकडून नागरीकांना दिला जातात. मुलांना विद्यार्थी दशेत सामाजिक भान जपता यावे यासाठी जय विविध शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवतात. प्रत्येकाने आपल्या घरातून निघणा-या कच-याचे खत तयार करुन ते झाडांसाठी वापरावे यासाठी जय फाउंडेशन अनेकदा विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती करत असते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश

News Desk

शिक्षकांवर विद्यार्थ्याने केला कोयत्यानी हल्ला

News Desk

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

News Desk